कोरोनाच्या नावाखाली शिक्षणाची कोंडी!
आदित्य गायकवाड 2020 मध्ये लावलेल्या टाळेबंदी/लॉकडाऊन मुळे जागतिक पातळीवर अनेक समस्या निर्माण झाल्या, त्याचाच एक परिणाम शिक्षण क्षेत्रावरही झाला. त्यावेळी कोरोना विषाणू बद्दल असलेले अपूर्ण माहिती, देशात उपलब्ध नसलेले आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ अशा अनेक कारणांमुळे लावल्या गेलेल्या टाळेबंदी मुळे आपले शैक्षणिक नुकसान झाले, याचा आपल्याला दूरगामी परिणाम भोगावा लागणार आहे. […]
