नामांतर हा आंबेडकरी स्वाभिमानाचा लढा
गुणवंत सरपाते नामांतर. आंबेडकरी चळवळीतला एक धगधगता कालखंड. सामुहीक संघर्षाचा तीव्र इतिहास. शेकडो झोपड्यांची राख. पेटललेले देह. कुऱ्हाडीने तोडलेले हातपाय. आसवं. किंकाळ्या. जय भीमचा गगनभेदी घोष. नक्की कुठून सुरुवात करावी ह्यावर लिहायला. मी जन्मलो वाढलो नांदेड जिल्ह्यात. आंदोलनात सर्वात जास्त पेटलेला भाग. बाबा,त्यांचे मित्र आणी बरेच नातेवाई सक्रीय सहभागी होते […]
