काडीमोड ~ निमित्य अण्णा भाऊ साठेंची जयंती
दिवस उगवला.त्याची सोनेरी किरणं नांदगावाकडं धावली.माणसं उठली,त्यांची श्रमशक्ती कार्यक्षम झाली.औताड्याची सखुबाई देवळातून परतली.शंकर जंगम बोलला-‘तुझ्या पोराची रास चांगली आहे,यंदा त्याच्यावर तांदूळ टाकून मोकळी हो.’सखु आनंदली.भीमाचं लगीन करायचं असा तिनं निश्चय केला.सखुचा नवरा एकएकी मेला तेव्हा सखु अवघी 20 वर्षांची होती नि तिच्या पदरी 2 वर्षाचा भीमा होता.झिंग्याएवढं मुल आज ना […]
